• Home
  • एजुकेशन- जॉब
  • MPSC Group C Bharti 2026: तलाठीसह 5707 गट-क पदांची मेगा भरती सुरू; पात्रता, पगार आणि अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती
एजुकेशन- जॉब

MPSC Group C Bharti 2026: तलाठीसह 5707 गट-क पदांची मेगा भरती सुरू; पात्रता, पगार आणि अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती

MPSC Group C Bharti 2026

MPSC Group C Bharti 2026: एमपीएससी ग्रुप सी भरती २०२६ अंतर्गत महाराष्ट्रातील विविध शासकीय विभागांमध्ये तलाठीसह गट- क संवर्गातील ५७०७ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांसाठी पात्रात, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, अर्ज शुल्क आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये गट-क संवर्गातील पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. MPSC Group C Bharti 2026 अंतर्गत एकूण 5707 पदे भरण्यात येणार असून सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची संधी आहे.

हेही वाचा: “डबल गेम”चा आरोप करत जरांगेंचा शिंदेंवर हल्लाबोल; उद्धव ठाकरे….

या भरतीमध्ये ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), लिपिक-टंकलेखक, कर सहायक, सहायक मोटार वाहन निरीक्षक, उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहायक यांसारख्या विविध पदांचा समावेश आहे.

MPSC Group C Bharti 2026 पदांची माहिती

या भरती अंतर्गत खालील पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे:

उद्योग निरीक्षक (Industry Inspector) – 09 पदे
तांत्रिक सहायक (Technical Assistant) – 03 पदे
कर सहायक (Tax Assistant) – 282 पदे
सहायक मोटार वाहन निरीक्षक (गट-क) (Assistant Motor Vehicle Inspector (Group-C))  – 461 पदे
लिपिक-टंकलेखक (Clerk-Typist) – 1864 पदे
ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) (Village Revenue Officer (Talathi)) – 1539 पदे
वरिष्ठ अभिलेखापाल/वरिष्ठ लिपिक/अभिलेखापाल (Senior Archivist/Senior Clerk/Accountant) – 11 पदे
सहायक अधीक्षक (गट-क) (Assistant Superintendent (Group-C)) – 11 पदे
सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक) (Assistant Fisheries Development Officer (Technical)) – 254 पदे
लिपिक-टंकलेखक (विविध विभाग) Clerk-Typist (Various Departments)  – 944 पदे
लिपिक-टंकलेखक (मुद्रांक विभाग) (Clerk-Typist (Stamp Department)) – 339 पदे

एकूण रिक्त पदे: 5707

शैक्षणिक पात्रता

पदानुसार उमेदवारांची शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे.

ग्राम महसूल अधिकारी (तलाठी): कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक.
लिपिक-टंकलेखक: कोणत्याही शाखेतील पदवी तसेच मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट आवश्यक.
कर सहायक: मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.
उद्योग निरीक्षक: अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी.
तांत्रिक सहायक: पदवी तसेच आवश्यक टंकलेखन पात्रता.
सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी: मत्स्यविज्ञान विषयातील B.F.Sc. पदवी आवश्यक.

वयोमर्यादा

या भरतीसाठी उमेदवारांचे वय 1 ऑक्टोबर 2026 रोजी 19 ते 38 वर्षे असावे.

मागासवर्गीय आणि अनाथ प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमानुसार 5 वर्षांची वयोमर्यादा सवलत मिळेल.

वेतनश्रेणी

निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार आकर्षक वेतन दिले जाईल.

उद्योग निरीक्षक: 35,400 ते 1,12,400
तांत्रिक सहायक: 29,200 ते 92,300
कर सहायक: 25,500 ते 81,100
सहायक मोटार वाहन निरीक्षक: 19,900 ते 63,200
लिपिक-टंकलेखक: 19,900 ते 63,200
तलाठी: अंदाजे 38,000 ते 45,000
वरिष्ठ लिपिक/अभिलेखापाल: अंदाजे 38,000 ते 45,000

अर्ज शुल्क किती?

खुला प्रवर्ग: ₹394
मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹294
माजी सैनिक: ₹44
नोकरीचे ठिकाण

तसेच निवड झालेल्यांची नियुक्ती ही महाराष्ट्रातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये केली जाणार आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख

उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ६ ऑगस्ट 2026 पूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे

ऑनलाइन अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक असतील:

10 वी व 12 वी प्रमाणपत्र
आधार कार्ड
मोबाईल क्रमांक
ई-मेल आयडी
फोटो व स्वाक्षरी
पदवी प्रमाणपत्र
जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
जात पडताळणी प्रमाणपत्र (लागू असल्यास)
रहिवासी दाखला (Domicile Certificate)

FAQ

1. MPSC Group C Bharti 2026 मध्ये एकूण किती पदे आहेत?
उत्तर: MPSC Group C Bharti 2026 अंतर्गत एकूण 5707 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.

2. तलाठी पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक आहे.

3. MPSC Group C भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
उत्तर: ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 ऑगस्ट 2026 आहे.

4. MPSC Group C भरतीमध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे?
उत्तर: या भरतीमध्ये तलाठी, लिपिक-टंकलेखक, कर सहायक, सहायक मोटार वाहन निरीक्षक, उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहायक यांसह विविध गट-क पदांचा समावेश आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts