Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • मुली पायावर पाय घालून बसतात, पण का? कारण जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल!
लाईफस्टाईल

मुली पायावर पाय घालून बसतात, पण का? कारण जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल!

Why Girls Women Sit Cross Legged
5
Why Girls Women Sit Cross Legged: पायावर पाय घालून बसण्याची सवय अनेक मुली आणि महिलांमध्ये सहज पाहायला मिळते. पण ही केवळ स्टाइल आहे की यामागे आराम, सवय आणि शरीराची ठेवण यांसारखी काही कारणं आहेत? चला, जाणून घेऊया यामागचं नेमकं खरं कारण.

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की काही मुली किंवा महिला खुर्चीवर बसतात (Girls Women Sit Cross Legged) सहजपणे एका पायावर दुसरा पाय ठेवून बसतात. ही बसण्याची पद्धत पाहून अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, असं का बसतात? यामागे नेमकं कारण काय आहे? खरं याला एकच कारण नसून आराम, सवय आणि शरीराची ठेवण यांसारख्या अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात.

हेही वाचा: मोठी बातमी! रोहित पवारांच्या पीएच्या 12 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू; रात्री घरातून बाहेर पडली अन् सकाळी… नेमकं काय घडलं?

आरामदायी वाटत असल्याने अशी पोझिशन

पायावर पाय ठेवून बसल्याने काही व्यक्तींना अधिक आरामदायी वाटतं. बराच वेळ खुर्चीवर बसताना शरीराची पोझिशन बदलण्याची गरज भासते. अशावेळी पाय क्रोस करून बसणं सहज आणि आरामदायी वाटू शकतं. त्यामुळं ही सवय नकळत विकसित होते. ( Lifestyle Latest News )

लहानपणापासूनची सवय

एखाद्या व्यक्तीला लहानपणापासून विशिष्ट पद्धतीने बसण्याची सवय असेल, तर मोठं झाल्यानंतरही तीच पोझिशन नकळत घेतली जाते. त्यामुळे प्रत्येक वेळी त्यामागे काही खास कारण असेलच असं नाही. lifestyle tips

शरीरभाषेशीही जोडला जातो

पायावर पाय ठेवण्याला (Sit Cross Legged) काही वेळा शरीरभाषेशी जोडले जाते. मात्र केवळ एखादी व्यक्ती अशा पद्धतीने बसली आहे म्हणून ती आत्मविश्वासू, अस्वस्थ किंवा नाराज आहे, असा ठाम निष्कर्ष काढता येत नाही. व्यक्तीची संपूर्ण देहबोली पाहिल्यानंतरच त्याचा अंदाज घेता येतो.

आरोग्याच्या दृष्टीने काय? (Heath Latest News)

काही वेळ पायावर पाय ठेवून बसणं सामान्य आहे. मात्र बराच वेळ एकाच पोझिशनमध्ये बसणं टाळावं. विशेषतः सतत बसून काम करणाऱ्यांनी वेळोवेळी उठून चालावं आणि बसण्याची स्थिती बदलावी. female body language

थोडक्यात, मुली पायावर पाय घालून बसतात यामागे कोणतंही एक गुपित कारण नाही. आरामदायी वाटणं, सवय आणि परिस्थितीनुसार बदललेली शरीराची ठेवण ही त्यामागची सामान्य कारणं असू शकतात.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts