Nitesh Rane vs Amruta Fadnavis: नवरात्रोत्सवाआधी गरबा-मुस्लिम प्रवेशाचा मुद्दा तापला. नितेश राणेंची आक्रमक भूमिका, तर अमृता फडणवीसांनी सर्वसमावेशकतेची बाजू घेतली. नेमका वाद काय?
नवरात्रोत्सव सुरू होण्याआधीच महाराष्ट्रात गरबा आणि दांडियाच्या प्रवेशावरून राजकीय वातावरण तापले आहे. विशेष म्हणजे, मुस्लिम नागरिकांना गरबा उत्सवात प्रवेश (Garba Muslim Entry) द्यायचा की नाही, या मुद्द्यावर भाजपशी संबंधित दोन प्रमुख चेहऱ्यांच्या भूमिका परस्परविरोधी असल्याचे समोर आले आहे. आमदार नितेश राणे यांनी गरबा मंडळांमध्ये मुस्लिम तरुणांच्या प्रवेशाला (Muslim Entry in Garba) विरोध करत कडक भूमिका घेतली आहे, तर अमृता फडणवीस यांनी सर्वसमावेशकतेची बाजू मांडत अशा प्रवेशाला विरोध करण्याचे कारण नसल्याचे म्हटले आहे.
नेमका वाद कशावरून झाला?
या वादाची सुरुवात विश्व हिंदू परिषदेच्या आवाहनाने झाली. नवरात्र (Navratri 2026) हा हिंदू धर्मातील पवित्र सण असल्याचे सांगत विहिंपने महाराष्ट्रातील गरबा आयोजकांना बिगर-हिंदूंना, विशेषतः मुस्लिम तरुणांना, गरबा मंडपात प्रवेश न देण्याचे आवाहन (Garba Controversy Maharashtra) केले.
हेही वाचा: ९ सप्टेंबरला ‘या’ राशींची बल्ले-बल्ले! रखडलेली कामं पूर्ण होणार, धनलाभाचेही संकेत
नितेश राणे यांची भूमिका (Nitesh Rane Statement)
यानंतर नितेश राणे यांनी या भूमिकेला पाठिंबा देत आणखी आक्रमक भूमिका मांडली. गरबा आणि दांडिया कार्यक्रम हे ‘लव्ह जिहाद’चे केंद्र बनत असल्याचा आरोप त्यांनी केला. मुस्लिम तरुण हिंदू नाव धारण करून किंवा धार्मिक चिन्हांचा वापर करून गरबा मंडळांमध्ये प्रवेश करतात आणि हिंदू मुलींना लक्ष्य करतात, असा दावा राणे यांनी केला.
प्रवेशासाठी आधार कार्ड तपासणी
गरबा मंडळांमध्ये प्रवेशासाठी (Garba Entry Rules) आधार कार्ड तपासणी सक्तीची Aadhaar Card Garba Entry) करावी, अशी मागणीही त्यांनी केली. एवढेच नव्हे तर टिळा लावणे आणि हनुमान चालीसा पठण करण्यासारख्या अटींचाही त्यांनी उल्लेख केला. मुस्लिम नागरिकांना गरब्यात सहभागी व्हायचे असल्यास त्यांनी हिंदू धर्म स्वीकारावा, असेही राणे यांनी म्हटले.
अमृता फडणवीस काय म्हणाले? (Amruta Fadnavis Statement)
मात्र, अमृता फडणवीस यांनी राणेंच्या भूमिकेशी असहमती व्यक्त केली. गरबा आता केवळ एका विशिष्ट समुदायापुरता मर्यादित राहिलेला नसून तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेला सांस्कृतिक उत्सव आहे, असे त्यांनी म्हटले. एखादा मुस्लिम किंवा इतर धर्माचा नागरिक शांततेत, कोणताही गोंधळ न घालता आणि उत्सवाचे नियम पाळून गरबा पाहण्यासाठी किंवा त्याचा आनंद घेण्यासाठी येत असेल, तर त्याला रोखण्याचे कारण नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. (Maharashtra Latest News)
अमित ठाकरे यांनीही राणेंच्या भूमिकेवर टीका
या दोन्ही भूमिकांमुळे भाजपच्या राजकीय भूमिकेवरही चर्चा सुरू झाली आहे. विरोधकांनी भाजपमध्ये वैचारिक गोंधळ असल्याचा आरोप केला आहे. मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनीही राणेंच्या भूमिकेवर टीका करत सणांच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला.
सोशल मीडियावरही मोठा वाद
दरम्यान, सोशल मीडियावरही या मुद्द्यावरून दोन मतप्रवाह दिसत आहेत. एका बाजूला हिंदू संघटनांकडून सुरक्षेच्या कारणास्तव ओळखपत्र तपासणीची मागणी योग्य असल्याचे सांगितले जात आहे, तर दुसऱ्या बाजूला सार्वजनिक उत्सवांमध्ये धर्माच्या आधारावर प्रवेश नाकारण्यास विरोध होत आहे. (Garba Festival News,)
गरबा हा सांस्कृतिक उत्सव राहणार की राजकीय वाद?
त्यामुळे यंदाच्या नवरात्रोत्सवात गरबा केवळ सांस्कृतिक उत्सव राहणार की त्याला राजकीय आणि धार्मिक वादाची किनार मिळणार, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. नितेश राणेंची आक्रमक हिंदुत्वाची भूमिका आणि अमृता फडणवीसांचा सर्वसमावेशकतेचा संदेश यामुळे भाजपमधील वैचारिक विविधतेची चर्चाही आता रंगली आहे.









