Garba Partner Rental : गरबा आणि मुस्लिमांची एन्ट्री यावरून वाद कमी होता की काय…आता गरब्यावरून आणखी एक नवा वाद पेटलाय, कारण गरब्याबाबत सोशल मीडियावर एक अशी जाहीरात फिरतेय, ती पाहून पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय काय? असा प्रश्न प्रत्येकाला पडेल…
आता हे जाहीरात बारकाईनं वाचा…यातले पॅकेजेस वाचा… ( Garba Partner )
सिल्व्हर-1 हजार रुपये
गरब्यासाठी दोन तास
मॅचिंग आऊटफिट्स
ऑकवर्ड पण क्यूट सेल्फी!
गोल्ड- 1 हजार 500 रुपये
गरब्यासाठी चार तास
भेटीची क्यूट बॅस्टोरी
मॅचिंग आऊटफिट्स
इन्टासाठी फोटो आणि रिल्स
प्लॅटिनम-2 हजार
पूर्ण दिवस गरबा
बेस्ट डान्स स्टेप्स
करब्यानंतर कपाळावर पप्पी
गरबा पार्टनरसाठी Silver, Gold आणि Platinum पॅकेजचा दावा ( Garba Partner Rental )
ही यांच्या गरबा पॅकेजची लिस्ट एवढ्यावरच थांबत नाही, तर यात प्रकरण डायमंड पॅकेजपर्यंत आणि यूएस रिटर्न्सपर्यंत पोहोचतंय…त्यामुळेच या पॅकेजवरून आता संभाजी ब्रिगेड अत्यंत आक्रमक झालीय. मराष्ट्रात भाडेतत्त्वावर गरब्यासाठी मुली देण्याचा हा गोरख धंदा संभाजी ब्रिगेड खपवून घेणार नाही. गरबा डान्स करण्यासाठी जर महाराष्ट्रात मुला मुलींची 1000 ते 5000 रुपये पर्यंत भाड्याने गरबा खेळण्यासाठी बोली लागत असेल तर संभाजी ब्रिगेड असे कार्यक्रम उधळून लावल्याशिवाय शांत बसणार नाही. पुरोगामी महाराष्ट्रात असले घाणेरडे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. अशी भूमिका ब्रिगेडनं घेतलीय…
‘महाराष्ट्रात असा प्रकार खपवून घेणार नाही’
एकीकडे राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यातच आता उत्सवाचे दिवस आहेत. आपले पारंपारिक उत्सव विनाकारण चुकीच्या धन दांडगे लोकांमुळे बदनाम करू नयेस, अशीही मागणी संभाजी ब्रिगेडनं केलीय.
या गरब्यावरून आधीच मोठा राजकीय राडा सुरू होता, गरब्यात मुस्लिमांना प्रवेश देऊ नये, अशी वक्तव्ये भाजपा आमदार नितेश राणे यांच्यासह अनेक नेत्यांनी केली होती, त्यानंतर खुद्द अमृता फडणवीस यांनीच राणेंच्या वक्तव्याला चपराक लावत, गरब्यात प्रत्येकानं सामील व्हायला हरकत नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती, तो वाद अजून शांत झाला नाही, तोवर आता या जाहीरातीनं आणि मुली भाड्यानं देण्याच्या प्रकारानं पुन्हा एकदा रान पेटवलंय. त्यामुळे आता हा वाद नेमका कुठपर्यंत जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…









