Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी
Top News

विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी

Rahul Narvekar Assembly Speaker

Congress demand FIR against Assembly Speaker Narvekar : सध्या राज्यात २९ महापालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यासाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. मात्र, त्यापूर्वी आरोप-प्रत्यारोपाचा फैरी झाडल्या जात आहेत. महापालिकांवर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जय्यत तयारी सुरू आहे. कुठे युती तर कुठे आघाडी तर काही ठिकाणी एकहाती निवडणुका लढवल्या जाणार आहेत. मात्र, सध्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कार्यकर्त्यांना दमदाटी केल्याच्या त्यांच्या एक व्हिडिओमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तर थेट नार्वेकर यांच्यावर गु्न्हा दाखल करण्याची मागणी केलीय. निवडणूक आयोगावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नसल्याने आयोग सैराट सुटला असल्याचा गंभीर आरोप सपकाळ यांनी केलाय.

विधानसभा अध्यक्षांना जे विशेष अधिकार दिले आहेत, त्या विशेष अधिकारांचे हनन होत आहे. आर्थिक आणि संविधानिक स्वरूपाचा भ्रष्टाचार तसेच कोणाला अडकतानाचा भ्रष्टाचार या तिन्ही प्रकरणामध्ये नार्वेकर हे दोषी आहेत. त्यामुळे त्यांची देशाच्या राष्ट्रपती यांनी तात्काळ बडतर्फ करायलाच हवं, अशी काँग्रेसची मागणी सपकाळ यांनी केलीय.

हेही वाचा – बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणाचा निषेध; महाविकास आघाडीचे मुक आंदोलन, भाजपवर गंभीर आरोप

फ्री अँन्ड फेअर निवडणूक संपन्न करण्याच्या धोरणाला काळिमा

सध्या राज्यात दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका सुरू आहेत. मात्र, काही लोकांकडून फ्री अँन्ड फेअर निवडणूक संपन्न करण्याच्या धोरणाला काळिमा फासण्याचा काम सुरू आहे. नगरपरिषद निवडणूकीत पैसे फेक आणि तपासा देख अशी परिस्थिती होती. आता देखील बाप बडा ना भैय्या सबसे बडा रुपया हा तमाशा सुरू आहे. निवडणुका या लोकशाहीचा सर्वात मोठा उत्साह आहे. नागरीकांनी मतदान करणं हा अधिकार आहे. मतांचा जोगवा उमेदवारांनी मागायचा असतो. यामध्ये ज्याला सर्वाधिक मतं मिळतात तो विजयी होतो. आणि पुढील पाच वर्ष जनतेची सेवा करण्याची शपथ घेतो.

मंत्री मंडळात 6 असे मंत्री होते जे बिगर काँग्रेसचे आहेत

हे निवडणूकिचे संस्कार आहेत. निवडणूका काही नवीन नाही. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सगळ्यांना जागा असली पाहिजे हे धोरण होत. म्हणून पहिल्यांदा मंत्री मंडळात 6 असे मंत्री होते जे बिगर काँग्रेसचे आहेत. गाव गाडा आपण चालवतो तेव्हा सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाण आवश्यक असतं. यांच्या सत्तेची ही भूक आता मोठी झाली आहे आणि लोकशाहीला गिळायला बसले आहेत. पैस्याचा खेळ आता पुन्हा गिरवला जात आहे. महापालिकेत आता बेशरम चारित्र्य घेऊन भाजप उतरले आहेत.

निवडणूक आयोग याच मूक साक्षीदार बनला

निवडणून येण्या आधीच भाजपने घोडेबाजार मांडला आहे. त्यांच्या करस्थानाचा आम्ही निषेध करतो. संविधान आणि निकोप लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही हा निषेध करत अहोत. पैशांचा मोठा खेळ झाला आहे आणि निवडणूक आयोग याच मूक साक्षीदार बनला आहे. काळ आपल्याला माफ करणार नाही वेळीच आपण सावध झालो नाही तर नोटाच अधिकार आभादीत आहे. निवडणूक होत असताना लोकांना अधिकार वापरता यावा यासाठी नोटाची मशीन ठेवावी अशी आमची मागणी आहे.

आम्ही आंदोलन करू बोल्यावर चौकशीचे आदेश दिले

निवडणूक आयोगाकडे आम्ही तक्रार केली. निवडणूक आयोगाने सकाळी आमच्या पत्राच उत्तरं देत की पुरावे द्या. यातून तो मी न्हवेच हे जे नाटक आहे ते निवडणूक आयोग करत आहे. आम्ही आंदोलन करू बोल्यावर चौकशीचे आदेश दिले आणि त्यात अधिकारी दोषी सापडले. टोकन देऊनही त्यांचे अर्ज स्वीकारले गेले नाही. कारण राहुल नार्वेकर तिथे जाऊन दम दाटी करतात. दुपारी ४ नंतरचं सीसीटीव्ही गायब केलं. राहुल नार्वेकर यांच्या कार्यालयात कोण कामं करतात याची माहिती आम्ही घेतं आहोत. जे गुंड आणि भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांना तिथे पदावर बसवलं आहे. निवडणूक आयोग गप्प का आहे. त्या अधिकाऱ्याची चुकी दिसून येत आहे, असंही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts