Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • कुत्रा पिसाळला 150 जणांना चावला, पिंपरी चिंचवडमध्ये 4 वर्षाच्या मुलीचे लचके तोडले!
Pune

कुत्रा पिसाळला 150 जणांना चावला, पिंपरी चिंचवडमध्ये 4 वर्षाच्या मुलीचे लचके तोडले!

Dog Attack

Dog Attack : राज्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी या कुत्र्यांनी थैमान घातलं आहे. ज्यात प्रमुखतः कल्याण डोंबिवली आणि पुण्याचा समावेश आहे. कल्याण पश्चिम परिसरातील संदीप हॉटेल आणि लगतच्या भागात या भटक्या कुत्र्यांचा वावर असल्याचे सांगितले जात आहे. रविवारी एका भटक्या कुत्र्याने तब्बल दीडशे नागरिकांचा चावा घेतला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. एक नाही.. दोन नाही.. तर तब्बल दीडशे लोकांना या भटक्या कुत्र्याने दवाखाण्याचा रस्ता दाखवला आहे. तर जखमींवर रुक्माई रुग्णालयात उपचार सुरु आहेत…

महाराष्ट्रात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांनी नागरिकांमध्ये दहशत ( Dog Attack )

Dog Attack Pune : तर भटक्या कुत्र्यांच्या दहशतीचं असच एक उदाहरण आज पुण्याच्या पिंपरीत बघायला मिळालं. एक अत्यंत हादरऊन टाकणाऱ्या घटनेचा व्हिडिओ समोर आलयं… आपण बघु शकतो की कश्या प्रकारे भटक्या कुत्र्यांनी एका चिमुकलीवर जीवघेणा हल्ला केला… ही चिमुकली रस्त्यावरुन जात असताना अचानक २ कुत्रे तिच्या दिशेने धावत आले… आणि चिमुकलीवर हल्ला करत तिला जमिनीवर पाडून चावा घेण्यास सुरुवात केली… बघता बघता अजून ५ कुत्रे आले आणि या कुत्र्यांनी निर्दयिपणे चिमुकलीचे लचके तोडण्यास सुरुवात केली… यावेळी चिमुकली जोर-जोरात मदतीसाठी ओरडत होती.. या सगळ्यात त्या छोट्याश्या जिवाचे काय हालं झाले असतील याची आपण कल्पना सुद्धा करु शकत नाही…

नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाल्याने आता पोलीसही या कुत्र्यांच्या शोधासाठी रस्त्यावर उतरले आहेत. परिसरातील नगरसेवक, त्यांचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकही कुत्र्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत पोलीसांची पथके परिसरात दाखल झाली आहेत. पोलिसांकडून संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवली जात असून, नागरिकांना धोका निर्माण करणाऱ्या कुत्र्यांना लवकरात लवकर पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यात वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाला व दशतवादाला प्रामुख्याने स्थानिक प्रशासन आणि या संदर्भातील कायद्यांची ढिसाळ अंमलबजावणी जबाबदार आहे का… सुनावणी व धोरणांनुसार योग्य निधीचा अभाव आणि नियोजनातील त्रुटींमुळे हा प्रश्न गंभीर बनला आहे.

हेही वाचा : गडचिरोलीत आश्रमशाळेवर काळाचा घाला! सर्पदंशाच्या

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येला जबाबदार कोण? ( Dog Attack )

या सगळ्यांना जबाबदार कोणं? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये पाठवावे की नाही हा विषय सार्वजनिक सुरक्षा आणि प्राण्यांच्या हक्कांवरून अत्यंत वादग्रस्त ठरला होता. यात डॉग लवर्स आणि जनावर संरक्षण संघटनांनी भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये पाठवण्याचा जोरदार विरोध केला होता. त्यानंतर न्यायालयाने काही प्रकरणांत कठोर आदेश दिले तरी नंतर नसबंदी करून कुत्र्यांना त्याच परिसरात सोडणे आणि फक्त हिंसक वा आजारी कुत्र्यांना शेल्टरमध्ये ठेवणे असा निर्णय घेतला… आता हा निर्णय चुकीचा ठरणार का? असा मोठा प्रश्न कुत्र्यांचा हैदोस बघता निर्माण झाला आहे…

कायद्यानुसार भटक्या कुत्र्यांना मारण्यास किंवा त्यांच्यावर बेकायदेशीर कारवाई करण्यास बंदी आहे. त्यांना केवळ नसबंदी करून त्याच परिसरात सोडणे बंधनकारक आहे. त्यामुळे या कुत्र्यांचा वावर देखील वाढला आहे. तर रस्त्यावर कुत्र्यांना अन्न देणारे श्वानप्रेमी आणि सुरक्षिततेची मागणी करणारे सामान्य नागरिक यांच्यातील संघर्षामुळे प्रशासनाला ठोस पावले उचलण्यात अडचणी येतात. महापालिकांकडून भटक्या कुत्र्यांची नसबंदी आणि लसीकरण नियमित व प्रभावीपणे होत नाही. आणि हे देखील या सगळ्यांसाठी एक मोठं कारण आहे.

शेल्टर होमचा मुद्दा पुन्हा चर्चेत

काही काळाआधी कुत्र्यांना शेल्टर होममध्ये पाठवण्याचा मुद्दा चांगलाच तापला होता…ज्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत बोल्ले होते की… भटक्या कुत्र्यांची समस्या त्यांना शेल्टरमध्ये पाठवून सुटणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. भागवत यांनी या मुद्द्यावर सरकारला पर्यायही सुचवला होता… मनुष्य आणि निसर्ग यांच्यामध्ये संतुलन राहणे आवश्यक आहे, असे भाष्यही त्यांनी केले होते… आता प्रशासनचं या सगळ्यांना जबाबदार का?… जर प्रशासनाने त्यावेळीच कुत्र्यांना शेल्टर होममध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला असता तर हे सगळ घडलच नसतं अशी भूमिका नागरिकांकडून मांडण्यात येत आहे…

या अत्यंत खळबळजनक आणि अंगाला काटा आणणाऱ्या घटनांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये या कुत्र्यांची मोठी भीती निर्माण झाली आहे. अचानक नागरिकांवर हल्ला करून चावा घेण्याच्या घटनांमध्ये तीव्रतेने वाढ होत असून आता या भटक्या कुत्र्यांची विल्लेवाट कोण लावणारं?.. यावर प्रशासनाची काय भुमिका असणार.. यावर सर्वांचेच लक्ष लागून आहे.

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics.Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts