Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • ‘सफदरजंग रुग्णालयावरील विश्वास उडाला’; सोनम वांगचूक यांच्या पत्नीचा गंभीर आरोप
देश

‘सफदरजंग रुग्णालयावरील विश्वास उडाला’; सोनम वांगचूक यांच्या पत्नीचा गंभीर आरोप

Sonam Wangchuk Wife Alleges
Sonam Wangchuk Wife Alleges: सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित करत अनेक गंभीर आरोप केले आहेत.

दिल्लीतील सफदरजंग सरकारी रुग्णालयात उपचार घेत असलेले पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या प्रकृतीबाबत त्यांच्या पत्नींनी गंभीर आरोप केले आहेत. रुग्णालयात प्रशासनाने आरोग्याशी संबंधित महत्वाची माहिती लपवली असून, वांगचूक यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात नकार दिला जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी उच्च न्यायलयात तातडीच्या सुनावणीची मागणीही करण्यात आली आहे.

कुटूंबियांच्या म्हणण्यानुसार, सफदरजंग रुग्णालयाने सुरुवातीला सोनम वांगचुक यांच्या रक्तातील पोटॅशियमची पातळी २.९ असल्याचे सांगितले. ही पातळी अत्यंत चिंताजनक आणि जीवघेणे असल्याचेही डॉक्टरांनी सांगितल्याचा दावा करण्यात आला. मात्र, रुग्णालयाने जाहीर केलेल्या सार्वजनिक आरोग्य बुलेटिनमध्ये हा आकडा नमूद न करता केवळ “पोटॅशियमची पातळी कमी होत आहे” एवढाच उल्लेख करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.’

हेही वाचा: अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकला; डोनाल्ड ट्रम्प यांचे नवे लष्करी आदेश, मध्यपूर्वेत तणाव शिगेला

यानंतर कुटुंबीयांनी सातत्याने केलेल्या विनंतीनंतर रात्री साडेदहा वाजता स्वतंत्र प्रयोगशाळेत रक्त तपासणी करण्याची परवानगी मिळाली. या तपासणीत पोटॅशियमची पातळी ३.५ असल्याचे समोर आले आहे, जी सामान्य मर्यादित असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या अहवालाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

आणखी आरोप

कुटुंबीयांनी आणखी आरोप करताना सांगितले की, वारंवार विनंती करूनही सोनम वांगचूक यांना डिस्चार्ज देण्यात आलेला नाही किंवा त्यांच्या पसंतीच्या खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगीही दिलेली नाही. रुग्णालयाच्या मजल्यावर सुमारे ३० पोलीस आणि संपूर्ण परिसरात १०० हून अधिक पोलीस तैनात असल्यामुळे त्यांच्या हालचालींवर कठोर निर्बंध घालण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला. ही वैद्यकीय सेवा नसून बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवण्याची कृती असल्याचेही कुटुंबीयांनी म्हटले आहे.

दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याची मागणी

सोनम वांगचूक यांच्या प्रकृतीला काहीही धोका निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी रुग्णालय प्रशासन आणि सरकारची असेल, असा इशाराही कुटुंबीयांनी दिला आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करत तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली आहे. वांगचूक यांची प्रकृती अधिक बिघडण्यापूर्वी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

दरम्यान, या आरोपांवर सफदरजंग रुग्णालय किंवा संबंधित सरकारी यंत्रणेकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts