• Home
  • महाराष्ट्र
  • आई-वडिलांना देवदर्शनाला घेऊन जायचं पण पैसे नाहीत? ‘ही योजना’ देईल मोफत संधी; जाणून घ्या लाभ कसा घ्यावा
ताज्या बातम्या

आई-वडिलांना देवदर्शनाला घेऊन जायचं पण पैसे नाहीत? ‘ही योजना’ देईल मोफत संधी; जाणून घ्या लाभ कसा घ्यावा

Chief Minister Yatra Scheme

Chief Minister Yatra Scheme: आई- वडिलांची तीर्थयात्रा पैशांअभावी थांबली आहे? आता चिंता सोडा! कारण मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना देत आहे मोफत देवदर्शनाची सुवर्णसंधी. जाणून घ्या, अर्ज कसा करायचा आणि लाभ कसा मिळवायचा

अनेकांचे स्वप्न असते बायको- पोरांसोबत निवांत फिरायला जावं. पण कधी पैशांची अडचण, तर कधी कामाच्या व्यापामुळे ते शक्य होत नाही. आणि ते स्वप्न तसंच राहून जातं. बघता बघता रिटायरमेंटही येते. मग वाटतं, आता तरी बायकोला घेऊन देवदर्शनाला जावं…पण तेव्हाही पैशांअभावी ते शक्य होत नाही. काही जणांची परिस्थिती अशी असते की ते मुलांकडेही काही मागू शकत नाहीत, म्हणून मनातलं मनातच ठेवतात. जर तुमचेही आई-वडील असाच विचार करत असतील, तर आता काळजी करू नका. ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ त्यांना मोफत तीर्थयात्रेची संधी देत आहे. चला तर मग जाणून घेऊया, या योजनेचा लाभ कसा घ्यायचा.

राज्यातील जेष्ठ नागरिकांना देशभरातील महत्वाच्या तीर्थक्षेत्रांना भेट देता यावी यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरू केली आहे. आर्थिक परिस्थितीमुळे तीर्थयात्रा करता न येणाऱ्या नागरिकांसाठी ही योजना अंत्यत उपयुक्त ठरत आहे. शासनाने अलीकडेच या योजनेत काही सुधारणा करून ती अधिक पारदर्शक आणि सोयीस्कर बनवली आहे.

हेही वाचा: घरच्या घरी तयार करा हॉटेलसारखा उपमा, अगदी सोपी रेसिपी!

या योजनेअंतर्गत देशातील सुमारे ७३ प्रमुख तीर्थस्थळे तसेच महाराष्ट्रातील ६६ महत्वाची धार्मिक स्थळे समाविष्ट करण्यात आली आहेत. प्रवास, निवास, जेवण आणि इतर आवश्यक सुविधा यांसह प्रति व्यक्ती जास्तीत जास्त ३०,००० रुपये इतका खर्च शासन उचलते. त्यामुळे गरिब व मध्यमवर्गीय कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक ताण न येता तीर्थयात्रा करता येते.

पात्रता अटी

अर्जदाराचे वय ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे
तो/ती महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असावा
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असावे
प्रवासासाठी शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे सरकारी डॉक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक

अर्ज प्रक्रिया

या योजनेसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करता येतो. महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल अॅप किंवा सेतू सेवा केंद्र यांद्वारे अर्ज सादर करता येतो. ज्यांना ऑनलाइन अर्ज करता येत नाही, त्यांच्यासाठी सेतू केंद्रांवर मोफत मदत उपलब्ध आहे.

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड
रेशन कार्ड
रहिवासी दाखला किंवा जन्म दाखला
उत्पन्न प्रमाणपत्र
सरकारी डॉक्टरांचे आरोग्य प्रमाणपत्र
पासपोर्ट आकाराचा फोटो

निवड प्रक्रिया

लाभार्थ्यांची निवड जिल्हास्तरावर केली जाते. प्रत्येक जिल्ह्यासाठी ठराविक कोटा असतो. अर्जांची संख्या जास्त असल्यास संगणकीकृत लॉटरी पद्धतीने निवड केली जाते. निवड न झालेल्या अर्जदारांची प्रतीक्षा यादी तयार केली जाते.

प्रवास व्यवस्था

प्रवास, राहण्याची आणि जेवणाची सोय शासन मान्यताप्राप्त पर्यटन संस्था आणि नोंदणीकृत एजन्सीद्वारे केली जाते. मात्र, प्रवाशांनी ठरलेल्या प्रस्थान स्थळी स्वतःच्या खर्चाने पोहोचणे आवश्यक आहे. प्रवासादरम्यान अतिरिक्त सुविधा घेतल्यास त्याचा खर्च स्वतःला करावा लागेल.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts